कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ |गव्हाचे दर चढे राहण्याच्या आशेने यंदा देशात गव्हाचा पेरा वाढण्याची चिन्हे आहेत. एक ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात ४५ लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झालीय. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरण्यांशी तुलना करता यंदा पेरा ९.७ टक्के वाढलाय. महाराष्ट्र हे काही प्रमुख गहू उत्पादक राज्य नाही. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांत गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात तुलनेने गव्हाचे क्षेत्र खूपच कमी आहे. परंतु यंदा गव्हाचे दर चढे राहण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातही गहू लागवड काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख बाजारांत सध्या गव्हाचा दर प्रति क्विंटल २ हजार ९०० रुपयांवर पोचला आहे. परंतु सरकार गव्हावरील ४० टक्के आयातकरात कपात करू शकते, अशा बातम्या येत आहेत. तसे झाले तर गव्हाच्या दरावर दबाव येऊ शकतो.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम