तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I 30 डिसेंबर २०२२ I मागीलवर्षी सरकारने मुक्त तूर आयातीचे धोरण राबविले होते. त्यामुळे देशात तुरीची विक्रमी ८ लाख ६० हजार टन आयात झाली होती. तर देशातील तूर उत्पादनही चांगले होते.

त्यामुळं बाजारात तुरीचे दर दबावात येऊन शेतकरी अडचणीत आले होते. सरकारने मुक्त आयातीला ३१ मार्चे २०२३ पर्यंत मुदत दिली होती. आता मुदत पुन्हा वाढवून २३ मार्च २०२४ पर्यंत केली. म्हणजेच जास्तीत जास्त तूर आयातीचा सरकारचा प्रयत्न असेल. पण जागतिक पातळीवर १० लाख टनांपेक्षा जास्त तूर उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. हा दर टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम