स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कृषिमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३१ डिसेंबर २०२२ । राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी अनुकूल धोरण आखणे गरजेचे आहे, अशी मागणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्राकडे केली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी (ता.२९) सत्तार यांची भेट घेत या मुद्द्यांवर मागणी केली होती.

त्यानंतर कृषिमंत्र्यांनी तातडीने या मागण्यांबाबत केंद्राला पत्र पाठवल्याची माहिती तुपकर यांनी दिली आहे. सत्तार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात म्हटले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा. यावर्षी सोयाबीन आणि कापूस पिकाच्या लागवड खर्चात वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसानही झाले. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम