लाल मिरची खातेय भाव ; १२ हजार मिळतोय दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ | सध्या लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात परतीच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळं यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या लाल मिरचीला सर्वांधिक म्हणजे सहा हजार रुपयापासून १२ हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. त्यामुळं चटणीचा दर देखील दुप्पट होणार आहेत. नंदूरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी नंदूरबार जिल्ह्यात लाखो क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत असते. याठिकाणी लाखोंची उलाढाल होत असते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम