कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ |सध्या परिस्थितीचा विचार केला तर व्यापारी थेट बांधावर जाऊन कोथिंबीर खरेदी करत असून काही ठिकाणी कोथिंबिरीला शेकडा चार हजार रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे.
मागणीच्या मानाने कोथिंबिरीची प्रचंड कमतरता बाजारपेठांमध्ये जाणवत असून त्यामुळेच बाजारभावात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होताना दिसून येत आहे. कोथिंबीर आणि मेथी ही दोन पिके कमी कालावधी येत असल्यामुळे शेतकरी दोन पिकांच्या मधला टाइमिंग किंवा एखाद्या पिक लागवडीला वेळ असेल तर वरच्यावर मेथीची आणि कोथिंबिरीची लागवड करतात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम