कृषी सेवक | ६ एप्रिल २०२४ | मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात हळदीचे दर १५ टक्क्यांनी घसरले आहेत. आज राज्यातील बाजार समितीत हळदीचे दर सरासरी १२००० ते १५००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी हळदीचे दर १८००० हजारांपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले होते. परंतु सध्या हळदीच्या दरात झालेल्या बदलावामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
नांदेड बाजार समितीत आज हळदीची २२२७ क्विंटल आवक झाली असून, कमाल १७१०० ते किमान १०६०० रुपये तर सरासरी १५००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. बसमत बाजार समितीत आज हळदीची ८६२ क्विंटल आवक झाली आहे. कमाल १९५०० ते किमान १४५०० रुपये तर सरासरी १५७०० रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत आज हळदीची ३००० क्विंटल आवक झाली. कमाल २५९२५ ते किमान ११००० रुपये तर सरासरी १२७०० रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत आज हळदीची ३२२ क्विंटल आवक झाली आहे. तसेच, कमाल २२००० ते किमान १६००० रुपये तर सरासरी १९००० रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज हळदीची ३००० क्विंटल आवक झाली असून, कमाल १६५५० ते किमान १४५०० रुपये तर सरासरी १५५२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मागील आठवडाभरात तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये नियमित आवकपेक्षा २५ टक्क्यांनी अधिक आवक वाढली. ज्यामुळे हळद बाजारातील वाढीनंतर, देशभरातील बाजार समित्यांमध्ये हळद दर पुन्हा १० ते १५ टक्क्यांनी घसरले आहेत. ज्यामुळे सध्या शेजारील राज्यांमधील हळद बाजारातील प्रभाव महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये देखील पाहायला मिळत आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम