दुष्काळी लातूरमध्ये विदेशी लाल मिरचीची शेती; तरुणाने साधली आर्थिक प्रगती!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ एप्रिल २०२४ | महाराष्ट्र राज्यात सध्या शेतकरी अधिक नफा मिळवून देणाऱ्या पिकांच्या लागवडीवर भर देत आहेत. यात काही शेतकरी हे नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीचे प्रयोग करत आहे. विशेष शेतकऱ्यांना यात यश देखील मिळत आहे. एका शेतकऱ्याने विदेशी लाल मिरचीचे यशस्वी उत्पादन घेतल्याचे समोर आले आहे.

 

गणेश नन्नागिरे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी आहे. लातूर जिल्हा हा प्रामुख्याने मराठवाड्यातील दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. ८ वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. परंतु, आता याच लातूर जिल्ह्यात नांदगाव येथे शेतकरी गणेश नन्नागिरे यांनी विदेशी वाणाच्या लाल मिरचीची यशस्वी लागवड केली आहे.

 

लातूर हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असला. तरी गणेशने आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करून शेती फुलवली आहे. गणेशने आपल्या दोन एकरात ड्रीप आणि मल्चिंग पेपरच्या साहाय्याने कमी पाण्यात विदेशी वाणाच्या मिरचीची लागवड केली असून आपल्या नाविन्यपूर्ण मिरची पिकाचा फांद्यांचा झाप मोठा असल्याने, त्याने त्याची टोमॅटोप्रमाणे बांधणी केली आहे.

 

गणेश नन्नागिरे याने आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड दिली असून, त्यासोबतच त्याने करार पद्धतीचा देखील अवलंब केला आहे. सध्या गणेशच्या मिरचीचा तोडा सुरु आहे. गणेशने एका कंपनीसोबत करार केला आहे. ज्याद्वारे तो आपली मिरची विदेशात निर्यात करत आहे.

 

सध्या तोडणी सुरु असून आपल्याला मिरचीला प्रति क्विंटलसाठी ओल्या मिरचीला २९००० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. असेदेखील गणेशने म्हटले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम