साखरेच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता !

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ६ एप्रिल २०२४ | एप्रिल महिन्यात गाळप हंगाम आटोपल्यानंतर साधारणपणे जून ते ऑक्टोबर या ऑफ सिझनमध्ये साखरेच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. असे ‘सेंट्रम ब्रोकिंग’ या शेअर बाजारातील आघाडीच्या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

 

paid add

साखर दराबाबतच्या सदर रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सध्या देशातंर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर आहेत. उत्तरप्रदेश या राज्यामध्ये सध्या साखरेचे दर ३७.५ रुपये प्रति किलो तर महाराष्ट्रामध्ये साखरेचे दर ३४ रुपये प्रति किलो इतके आहे. अर्थात सध्या साखरेचे दर स्थिर असले तरी पुढील वर्षीचा ऊस गाळप सुरु होण्याआधी ऑफ सीझनमध्ये साखरेचे दर वाढलेले पाहायला मिळू शकतात. ३१ मार्चपर्यंत देशात २९५० लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. जे गेल्या वर्षी याच कालावधीत ३०५० लाख टन इतके नोंदवले गेलेले आहे. आता हंगाम सुरूच असल्याने, हे लक्ष्य सहज पार होऊ शकते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम