महागाईतून मोठा दिलासा: एलपीजी सिलिंडर दरात कपात

बातमी शेअर करा

देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू असून, ४ जून रोजी निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वीच महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. १ जून २०२४ पासून एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. दिल्लीत १९ किलोचा सिलिंडर ६९.५० रुपये स्वस्त होऊन १६७६ रुपये झाला आहे. कोलकातामध्ये ७२ रुपयांची कपात होऊन किंमत १७८७ रुपये झाली आहे. मुंबईत सिलिंडर ६९.५० रुपयांनी कमी होऊन १६२९ रुपये झाला आहे, तर चेन्नईत ७०.५० रुपये कमी होऊन किंमत १८४०.५० रुपये झाली आहे.

मान्सून अपडेट: लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

या दरकपातीमुळे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातही दर कमी करण्यात आले होते. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८०३ रुपये आहे, तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ६०३ रुपये आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे बाहेरच्या खाण्याच्या किंमतीतही कमी होण्याची शक्यता आहे.

Cotton Seed : विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस बियाण्याची टंचाई: शेतकऱ्यांमध्ये गोंधळ

सर्व नवीन दर १ जून २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांनी आयओसीएलच्या वेबसाईटवर जाऊन नवीन दर तपासावेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम