आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे देशात पहिल्या रेडकूला जन्म देणारी ‘बन्नी म्हैस’

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ६ एप्रिल २०२४ | आज आपण अशा म्हशीबद्दल माहिती घेणार आहोत, जिने IVF तंत्रज्ञानाद्वारे देशात पहिल्या रेडकूला जन्म दिलेला आहे. सदर म्हशीच नाव आहे ‘बन्नी म्हैस’.

 

दूध उत्पादनासाठी पाळल्या जाणाऱ्या या म्हशीचा उगम पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून झाल्याचे सांगण्यात येते, भारतात गुजरात मधील कच्छ भागात सदर म्हशी आढळतात. कच्छ जिल्ह्यात या म्हशीच्या मुबलकतेमुळे तिला ‘कच्छी म्हैस’ किंवा कुंडी म्हैस म्हणूनही ओळखतात.

 

काळ्या रंगाची असणारी बन्नी म्हैस काही ठिकाणी तपकिरी रंगाची देखील आढळून येते. बन्नी म्हशी आकाराने मध्यम ते मोठ्या असतात आणि त्यांच्या शरीरावर भरपूर केस देखील असतात. या म्हशीची कातडी पातळ व मऊ असून तिचे कपाळ लांब असते. या म्हशींना गुंडाळलेली शिंगे असतात. म्हशीचे वजन ४७५-५७५ किलो असते.

paid add

‘बन्नी म्हैस’ म्हशीचे प्रथम माजावर येण्याचे वय ३८ ते ४१ महिने या दरम्यान असते.

बन्नी म्हशीचा एकूण दूध देण्याचा सरासरी कालावधी ३०० दिवसांचा असतो. एका वेताला साधारणपणे ६००० लिटर दूध देण्याची क्षमता असते. ‘बन्नी म्हैस’ दिवसाला १० ते १५ लिटर इतके दूध देते.

 

पाणीटंचाईच्या परिस्थितीत तग धरण्याची क्षमता, दुष्काळी परिस्थितीत लांबचे अंतर कापण्याची क्षमता, उच्च दूध उत्पादकता आणि चांगली रोग प्रतिकारशक्ती हे ‘बन्नी म्हैस’ म्हशीचे काही खास गुण. आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाद्वारे देशात बन्नी म्हशीच्या पहिल्या रेड्कुचा जन्म झाला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम