पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा; ‘या’ राज्यांनाही दिला इशारा!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ६ एप्रिल २०२४ | महाराष्ट्र राज्यात सध्या काहीसे संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. आज दि. ६, महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने विदर्भ पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळू शकते. तर उद्यापासून दि.७ पुढील आठवडाभर महाराष्ट्र राज्यात पावसाचे वातावरण पाहायला मिळू शकते. मुंबई आणि कोकण पट्टा वगळता उर्वरित सर्वच भागांमध्ये आठवडाभर भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यात प्रामुख्याने काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, काही भागांमध्ये हलका- मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

७ एप्रिल – वाशीम व यवतमाळ – ऑरेंज अलर्ट.
तर नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार – यलो अलर्ट.

८ एप्रिल – अमरावती, वर्धा, चंद्रपूर – ऑरेंज अलर्ट.
तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा, जालना, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव – यलो अलर्ट.

paid add

९ एप्रिल – नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, पुणे – ऑरेंज अलर्ट.

महाराष्ट्र, हिमालयीन पट्टा, मध्यप्रदेश, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक या राज्यांची पश्चिम किनारपट्टी परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. साधारणपणे पुढील पाच दिवस या राज्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम