कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी महा-डीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.शेततळे अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असावे. शेततळ्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळ्याच्या कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. ५ टक्के दिव्यांग लाभार्थी असतील, तर उर्वरित पैकी ७० टक्के पुरुष व ३० टक्के महिला या प्रमाणात लाभ देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम