मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I देशातील तेलबिया आणि खाद्यतेल क्षेत्राच्या दृष्टीने सकारात्मक घटना घडलेली आहे. रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक असलेल्या मोहरीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे.

 

यंदाच्या रब्बी हंगामात मोहरीचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ टक्के वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदा मोहरीचे लागवड क्षेत्र ९४ ते ९५ लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे.गेल्या वर्षी ११० लाख टन मोहरी उत्पादन झाले होते.

 

यंदा मोहरी उत्पादन विक्रमी १२० लाख टनावर पोहचण्याची चिन्हे आहेत. उत्तरेकडील अनेक राज्यांनी कडधान्य पिकांखालील क्षेत्र मोहरीकडे वळते केले आहे. मोहरीला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक किफायतशीर वाटू लागले आहे.

देशातील प्रमुख नऊ तेलबिया पिकांपैकी मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे देशातील खाद्यतेलाचा तुटवडा कमी करण्यासाठी मोहरीवर भर देणे फायदेशीर ठरू शकते. केंद्र सरकारने जीएम मोहरीला हिरवा कंदील दाखवण्यासाठी धोरणात्मक हालचाली केल्याचाही सकारात्मक परिणाम मोहरी उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम