कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडीला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात रोज गाजर आणि काकडीची आवक प्रत्येकी १० ते २० क्विंटलपर्यंत राहिली.
त्यांची आवक स्थानिक भागातूनच राहिली. पण मागणीच्या तुलनेत आवक कमी राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना चांगला उठाव मिळतो आहे. गाजराला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये तर काकडीला किमान ८०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, कारली, कोबीचे दरही काहीसे स्थिर राहिले.
त्यांचीही आवक तशी जेमतेमच राहिली. वांग्याची रोज २० ते ३० क्विंटल, कोबीची ३० ते ४० क्विंटल आणि कारल्याची २ ते ५ क्विंटल अशी आवक राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये, कारल्याला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये तर कोबीला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम