कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वालपापडी-घेवड्याची आवक ७,७६८ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल २,००० ते ३,००० असा तर सरासरी दर
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वालपापडी-घेवड्याची आवक ७,७६८ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल २,००० ते ३,००० असा तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,०५० ते ३,२०० तर सरासरी दर २६२५ रुपये राहिला. आवकेत वाढ झाल्याने दरात दरात काहीशी घसरण दिसून आली.
दरवाढीनंतर पुन्हा कांदा दरात ५० टक्क्यांनी घसरणचालू वर्षी उन्हाळ कांद्याला एप्रिल महिन्यापासून तर सप्टेंबरपर्यंत उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळाल्याची स्थिती होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मागणी वाढू लागल्याने दरात हळूहळू सुधारणा दिसून आली.
सप्ताहात भाजीपाला व पालेभाज्यांची आवक (Vegetable Arrival) वाढल्याने बाजारभाव काहीसे कमी झाल्याचे दिसून आले. आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले.हिरवी मिरचीची आवक ९५१ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,००० ते ३,००० रुपये तर सरासरी दर २,४५० रुपये मिळाला. गाजराची आवक ८४१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,००० तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला.
उन्हाळ कांद्याची आवक ६,०२६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १,५५१ तर सरासरी दर १,२५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५९२५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,१५० ते १,८५० तर सरासरी दर १,५५० रुपये राहिला. लसणाची आवक ३०२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,८०० ते ८,००० तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला.आद्रकची आवक १०१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६,४०० ते ७,००० तर सरासरी दर ६,८०० रुपये राहिला. फळभाज्यामध्ये टोमॅटोला ४० ते २०० तर सरासरी १२०, वांगी २०० ते ४०० तर सरासरी ३००, फ्लॉवर ३० ते ५० सरासरी ४० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ४० ते ८० तर सरासरी ६० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम