कापसाची शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १६ डिसेंबर २०२२ I भारतासोबतच पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही कापूस पिकाला फटका बसला. त्यामुळं जागतिक कापूस वापर कमी राहण्याचा अंदाज असला तरी दर चांगलेच राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

चालू हंगामात १ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या अडीच महिन्यांच्या काळात ५८ लाख गाठी कापसाची आवक झाल्याचं उद्योगांनी स्पष्ट केलं. मात्र गेल्यावर्षी याच काळात १०६ लाख गाठी कापसाची आवक झाली होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा ४५ टक्क्यांनी कापूस आवक कमी राहीली.

 

मागील काही दिवसांपासून दर नरमल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली. यंदा देशातील कापूस उत्पादन कमी आहे, डिसेंबरनंतर कापसाचे दर सुधारू शकतात याचा अंदाज शेतकऱ्यांना आलाय. त्यामुळं शेतकरी सध्या गरजेपुरताच कापूस विकत आहेत. त्यामुळं सध्या तरी कापसाचा स्टाॅकीस्ट शेतकरीच असल्याचं जाणकार सांगतात.

 

सध्या देशातील बाजारात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळतोय. जानेवारीत कापसाचे दर वाढू शकतात. शेतकऱ्यांना यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम