“या” ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ मे २०२४ | सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्राला जोडून परिसरात असल्याने महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवसात काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बोगस बियाणे सापडल्यास थेट ‘या’ नंबरवर तक्रार नोंदवा, जाणून घ्या अधिक माहिती

मोसमी पाऊस अंदमान-निकोबारसह बंगालच्या उपसागरात रविवारी दाखल झाला. त्यामुळे तमिळनाडू आणि केरळ परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, येत्या १० दिवसांत म्हणजे ३१ मेपर्यंत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात दरम्यान अवकाळी पावसाला पोषक स्थिती तयार झाली असून, बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जैविक खत द्याल तर जमिनीचे होईल सोने; पीक येईल मोत्यांसारखे

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, दिनांक २० मे २०२४ धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक २१ मे २०२४: परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत तर दिनांक २२ मे २०२४: लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम