कृषी सेवक | २१ मे २०२४ | यावर्षी कमी उत्पादनामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात जांभळांचे दर हापूस आंब्याच्या दराशी स्पर्धा करत आहेत. फळबाजारात हापूस आंब्याच्या एका डझनाची किंमत ४०० रुपये आहे, तर जांभळांचे दर ४०० ते ४५० रुपये प्रति किलो आहेत.
उन्हाळ्यात रानमेव्याला चांगली मागणी असते आणि बाजारात रानमेव्याची आवकही वाढलेली असते. याच रानमेव्यांपैकी जांभूळ हे एक महत्त्वाचे फळ आहे. सध्या शहरातील विविध फळ विक्रेत्यांकडे गोड-तुरट जांभळे विक्रीला आले आहेत. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जांभळांचे दर वाढल्याने ग्राहकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
पिंपरी-चिंचवड मार्केटमध्ये लोणावळा, खंडाळा येथून जांभळांची आवक होते. यावर्षी हवामानातील लहरीपणामुळे हंगाम १५ ते २० दिवस उशिराने सुरू झाला. यामुळे उत्पादनात घट झाल्याने बाजारात जांभळांची आवक कमी झाली आहे.
“या” ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस
सध्या बाजारात मध्यम आकाराच्या स्थानिक जांभळांना प्रति किलो ३०० ते ४०० रुपये दर मिळत आहे. लहान जांभळांना ३०० रुपये दर मिळत आहे. दर्जेदार जांभळांना ४०० ते ४५० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे जांभूळ विक्रेते किरण वंजारी यांनी सांगितले.
वैशिष्ट्ये:
स्थानिक जांभूळ: साल पातळ, टिकवणक्षमता कमी, गुजरातच्या तुलनेत अधिक गोड, राज्यात मोठी पसंती.
कर्नाटक, गुजरातची जांभळे: लालसर, साल जाड, टिकवणक्षमता अधिक, गोडीलाही चांगली, मोठी पसंती.
जैविक खत द्याल तर जमिनीचे होईल सोने; पीक येईल मोत्यांसारखे
गुजरातच्या जांभळाची आवक कमी
दरवर्षी एप्रिलच्या शेवटी गुजरात आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात जांभळे येतात. पण यावर्षी गुजरातमधून आवक कमी झाली असून कर्नाटकातून अजूनही आवक सुरू झालेली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक भागातून जांभळे बाजारात विक्रीसाठी येत आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम