कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | निळवंडे कालव्यांच्या कामाकडे माझे लक्ष आहे. ठरल्याप्रमाणे कालव्यांची चाचणी घेऊन या प्रकल्पाचे लोकार्पण करता यावे, यासाठी या कामातील अडचणी दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निळवंडे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी (ता. २३) शिर्डी येथे येऊन संत साईबाबांचे दर्शन घेतले. या वेळी निळवंडे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निळवंडे कालव्यांच्या बंद कामाबाबत निवेदन दिले.
स्टोन क्रशर बंद आहेत. वाळू मिळत नसल्याने कालव्यांची कामे बंद पडली. ठेकेदार कंपन्यांनी आपली यंत्रसामग्री अन्यत्र हलविली. त्यामुळे येत्या डिसेंबरअखेर कालव्यांची कामे पूर्ण होतील, असे वाटत नाही, असे निवेदनाद्वारे सांगितले.
त्यावर शिंदे यांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले. श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार व्हावा, नगर ते सावळीविहीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम