साखरेचा निर्यातकोटा वाढण्याची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | केंद्र सरकार यंदाच्या हंगामात आणखी २० ते ४० लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा भारताची एकूण साखर निर्यात ८० ते १०० लाख टन राहण्याची चिन्हे आहेत. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजे इस्माने ही माहिती दिली आहे.

 

भारत हा साखरेचा जगातला सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे. तर साखर निर्यातीच्या बाबतीत ब्राझीलनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी भारताने ११० लाख टन साखर निर्यात केली होती. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी यंदाच्या हंगामासाठी ६० लाख टन साखर निर्यातीचा कोटा जाहीर केला होता. परंतु त्यात दुसऱ्या टप्प्यात वाढ केली जाईल, असं इस्माचं म्हणणं आहे. साखरेच्या निर्यात कोट्यात वाढ झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम