कृषी सेवक I १५ डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात सध्या कापसाचे दर काहीसे स्थिर आहेत. त्यामुळे बाजारातील आवकही घटली. चालू महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापूस दर कमी झाले होते. सध्या कापासाची आवक जवळपास ४० टक्क्यांनी कमी आहे.
त्यामुळं कापसाचे दर टिकून आहेत. सध्या कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. उत्तर भारतातील सरासरी दर काहीसा जास्त आहे. अभ्यासकांच्या मते चालू महिन्यात कापूस बाजारात चढ उतार राहतील. मात्र जानेवारीपासून दरात सुधारणा होऊ शकते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम