बाजारात नव्या तुरीची आवक वाढली

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ९ डिसेंबर २०२२ Iदेशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र सध्या आवकेचे प्रमाण कमी आहे.

 

त्यातही मालामध्ये ओलावा अधिक येतोय. पण देशात तुरीचा तुटवडा असल्याने प्रक्रिया उद्योगांकडून तुरीला चांगली मागणी आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या नव्या तुरीला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तुरीचे हे दर हंगामात टिकून राहतील, असा अंदाजही प्रक्रिया उद्योगाने व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम