कृषी सेवक I १ डिसेंबर २०२२ I पाम तेलाच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, रिफाईन्ड पाम तेलाच्या आयातीवरील शुल्क १२.५ टक्क्यावरून २० टक्के करावे, अशी मागणी सॉल्वन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे एसईएने केली आहे.
सध्या कच्चे म्हणजे क्रुड पाम तेल आणि रिफाईन्ड पाम तेलाच्या आयातशुल्कातील फरक केवळ ७.५ टक्के आहे. त्यामुळे देशात रिफाईन्ड पामतेलाच्या आयातीचा भडिमार सुरू आहे. इंडोनेशिया आणि मलेशियातील रिफायनरींना त्याचा फायदा होतोय. वास्तविक क्रुड आणि रिफाईन्ड पाम तेलाच्या आयात शुल्कातील फरक किमान १५ टक्के असला पाहिजे, असे एसईएचे म्हणणे आहे.
त्यासाठी क्रुड पाम तेलावरचे सध्याचे आयातशुल्क कायम ठेऊन केवळ रिफाईन्ड पाम तेलावरील आयात शुल्क २० टक्के करावे, अशी मागणी सीएआयने केली आहे. पाम तेलाचे दर वाढले तर त्याचा थेट फायदा सोयाबीनला होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम