कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १२ डिसेंबर २०२२ I जागतिक कापूस उत्पादनात यंदा घट होण्याचा अंदाज आहे. मात्र अनेक देशांतील कापडाची मागणी वाढलेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ-उतार कायम आहेत.

 

paid add

आजही कापसाचे दर काहीसे कमी होऊन ८०.३५ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील काही बाजारांमध्ये दरात सुधारणा झाली होती. मात्र अनेक ठिकाणी दर स्थिर होते. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळाला. चालू महिन्यात कापसाच्या बाजारात चढ-उतार राहण्याचा अंदाज आहे, तर पुढील महिन्यात दर सुधारू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम