कृषी सेवक I १२ डिसेंबर २०२२ I सध्या काबुली हरभऱ्याचा बाजार तेजीत आहे. काबुली हरभऱ्याला सध्या १२ हजार ते १३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. देशातील लग्नसराईचे दिवस सुरु झाले.
त्यातच निर्यातीसाठीही काबुली हरभऱ्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. बाजारातील अभ्यासकांच्या मते, चालू आठवड्यात काबुली हरभरा दरात क्विंटमागे १०० ते २०० रुपयांची तेजी-मंदी राहू शकते. मात्र दीर्घकालीन कल पाहता काबुली हरभऱ्याचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज आहे
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम