शेवग्यापासून सुरु करू शकता ‘हा’ प्रक्रिया उद्योग; बनतात ‘ही’ उत्पादने!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २८ एप्रिल २०२४ । आपल्या देशाच्या समृद्ध पाककला परंपरेने आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळांचा आस्वाद घेण्यास आणि चव घेण्यास मदत केली आहे आणि त्यामुळे अनेक आरोग्य फायदे आपल्याला मिळतात. अशीच एक आश्चर्यकारक भाजी जी खूप मोलाची आहे आणि आपली आवड मिळवते ती म्हणजे शेवगा. शेवगा ही एक बहुगुणी वनस्पती म्हणून ओळखली जाते. शेवगा हे झपाट्याने वाढणारे झाड आहे आणि त्याच्या कोमल बियांच्या शेंगा, महत्वाच्या पोषक तत्वांसह भाजीपाला म्हणून वापरल्या जाणाऱ्या पाने आणि त्याच्या अपरिहार्य औषधी गुणधर्मांसाठी सिद्धामध्ये औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. शेवगा ही १०८ रोगांचे निदान करणारी आरोग्यदायी वनस्पती आहे.

‘या’ आहेत सोयाबीनचे चार प्रमुख वाण; शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती!

शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत. शेवग्याची कोवळी पाने, फुले आणि शेंगाची भाजी करतात. शेवगा अनेक शतकांपासून त्याच्या वैद्यकीय गुणधर्मासाठी आणि आरोग्यदायी लाभांमुळे विविध स्वरूपात वापरला जातो. जागतिक स्तरावर शेवग्याच्या उत्पादनांची मागणी उदाहरणार्थ शेवग्याच्या पानांची पूड, शेवग्याचे तेल यात सतत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेवगाआधारित प्रक्रिया उद्योगांबद्दल जाणून घेणार आहोत.

शेवग्याच्या बिया व पानाची पावडरचा उपयोग करून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. जसे की, पावडरचा उपयोग बेकरी पदार्थांमध्ये केला जातो. पावडरचा काही २० ते ४०% प्रमाणात उपयोग करून बिस्कीट, कुकीज, केक, चॉकलेट मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात. शेवग्याच्या पानांचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जातो. ही पाने भाजी स्वरूपातील खाण्यासाठी उपयोग होतो, त्यानंतर पाने वाळवून त्याची भुकटी बनवून त्याचा वापर भाज्या, ब्रेड, पास्ता या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.

१. शेवग्याच्या पानांची भुकटी : सुरूवातीला पाने झाडावरून काढून स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर पाने सावलीत २ ते ३ दिवस वाळवावीत. उन्हामध्ये वाळवल्यास अ जीवनसत्त्व कमी होते. वाळलेल्या पानांची मिक्सर किंवा पल्वलाईजरमध्ये बारीक करून भुकटी तयार करून घ्यावी. साधारणतः ५० किलो शेवग्याच्या पानापासून आपल्याला १२ ते १५ किलो पावडर मिळते. तयार केलेली शेवग्याच्या पानाची पावडर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये किंवा पाउचमध्ये कोरड्या ठिकाणी साठवणूक केल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकते, तयार झालेल्या पावडरचा उपयोग बेकरी उत्पादनात केला जातो.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान, गुजरातच्या कांद्याला परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय!

२. शेवग्याच्या पानांचा रस : सुरूवातीला शेवग्याची १० किलो ताजी पाने स्वच्छ धुवून घ्यावीत व तिला मंद आचेवर ५ मी. गरम करावीत त्यांनंतर थंड करून घ्यावीत. शेवग्याच्या १० किलो पानामध्ये १ लिटर पाणी टाकून हॅमर मिलच्या साह्याने बारीक करून – दळून घ्यावीत. तयार झालेल्या शेवग्याचा शेंगाचा रस गाळून घ्यावा व त्यामध्ये २५० ग्रॅम साखर व २० ग्रॅम जिरे पावडर टाकून मिसळून घ्यावीत. तयार झालेल्या रसाला ३ ते ४ अंश तापमानाला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे.

३. शेवग्याच्या पानाचा चहा : सुरूवातीला शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत व सावलीमध्ये वाळवून घ्यावीत. वाळवलेली पाने चहा पूडप्रमाणे बारीक करून घ्यावीत. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये शेवग्याच्या पानाची पावडर मिसळावी व साखर टाकून मिसळून घ्यावे. तयार झालेला शेवग्याच्या पानाचा चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये ४ ते ५ थेंब लिंबू रस मिसळून घ्यावे. तयार झालेला चहा अतिशय गुणकारी असून चवीला ही चांगला लागतो.

४. शेवगा पानाची कॅप्सूल : जिलेटीनपासून तयार केलेल्या रिकाम्या कॅप्सूलमध्ये शेवगाची पानाची भुकटीचा वापर करून कॅप्सूल तयार करता येतात.

कापूस निर्यातीमध्ये १३७ टक्क्यांनी वाढ; हंगामातील दर घसरणीचा परिणाम!

५. शेवग्याच्या बियांची पावडर : शेवग्याच्या बियामध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व असतात जसे की प्रथिनांचे प्रमाण चांगले आहे. शेवग्याच्या बिया पाण्यामध्ये घेऊन १० ते १५ मिनिटे उकळून घ्याव्यात. त्यानंतर त्यावरील पारदर्शक भाग काढून घ्यावा. त्यानंतर बिया सूर्यप्रकाशात वाळवून घ्याव्यात. बिया वाळल्यानंतर त्याला पल्वरायजर म्हणजेच पावडर करण्याचे यंत्रा मध्ये बारीक करून घ्यावात. बियांची पावडर तयार करून, त्याचा उपयोग स्वासेस, सिजनींगमध्ये केला जातो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम