कापसाचे दर स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ७ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आज एक टक्क्यांची सुधारणा पाहायला मिळाली. आज कापसाचे वायदे ८४.९४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. मात्र देशातील कापूस दर आजही अनेक बाजारात स्थिर होते. आज कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. सध्या देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहेत. पण सध्या चीन, भारत, पाकिस्तान आणि टर्की आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस खरेदी करत आहेत. त्यामुळे कापसाचे दर सुधारत आहेत. परिणामी देशातील कापूस दर पुढील काही दिवसांत सरासरी ९ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम