कापसाने सरासरी ८ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापसाच्या दरात सुधारणा होत गेली. आंतरराष्ट्रीय तसेच देशातील बाजारातही कापसाचे दर वाढले. ऑक्टोबर महिन्यातील दबाव नोव्हेंबरमध्ये काहीसा दूर झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात २६ ऑगस्टला कापसाचे दर ११८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तेव्हापासून कापसाच्या दरात सतत घट होत गेली. ३१ ऑक्टोबरला कापूस दर जवळपास दोन वर्षातील निचांकी पातळी गाठत ७२ सेंटपर्यंत घसरले होते. मात्र त्यानंतर कापसाचे दर वाढत गेले.

कालपर्यंत कापूस दराने ८८.२ सेंटपर्यंत मजल मारली. देशातही कपसाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री कमी केली होती. त्यामुळे दरात वाढ होत कापसाने सरासरी ८ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला. तर कमाल दर ९ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले. तर दुसरीकडे कापडाला उठाव नसल्याची चर्चा अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे कापसाच्या दरात चढ-उतार होऊ शकतात, असाही अंदाज काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. पण शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम