सोलापुरात स्टार्टअप फेस्टिव्हल कार्यक्रमाचे नियोजन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | सोलापूर जिल्ह्यात रस्त्यांचे आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. यामुळे नव्याने उद्योग सुरू व्हावेत, असे वातावरण निर्मिती करावयाची आहे. स्थानिक आणि इतर नवउद्योजकांना चालना मिळण्यासाठी स्टार्टअप फेस्टिव्हल कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी देशभरातील नव-उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल,’अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शासकीय तांत्रिक संशोधन व विकास परिषद नागपूरचे सदस्य सचिव केतन मोहितकर, मनपा उपायुक्त पुष्पगंधा भगत, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त सचिन जाधव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू राजेश गडेवार, एम. एस. उडाशिवे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

स्टार्टअप फेस्टिव्हलच्या आयोजनासंदर्भात सर्व संबंधित विभाग, संस्था आणि इतर घटकांसमवेत प्राथमिक स्वरूपात कार्यक्रमाची रूपरेषा या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शंभरकर म्हणाले, ‘‘उद्योजकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ यांच्या साह्याने नावीन्यपूर्ण प्रकल्पनिर्मिती आदींसाठी प्रयत्न करण्यात येतील. देशभरातील १०० नवउद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम