शेवगाला मिळतोय बाजारात चांगला भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | सध्या बाजारात शेवग्याचा तुटवडा जाणवतोय. सध्या केवळ मुंबई बाजार समितीतच शेवग्याची आवक जास्त दिसते. मात्र इतर बाजारातील आवक ही ५ ते १० क्विंटलच्या दरम्यान आहे. त्यामुळं शेवगा सध्या चांगलाच भाव खातोय. शेवग्याला राज्यातील बाजारात सध्या सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. बाजारात आवक वाढेपर्यंत शेवग्याचे दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम