येत्या आठ दिवसांत पीक विम्याची भरपाई मिळणार – कृषिमंत्री

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १६ नोव्हेंबर २०२२ | येत्या आठ दिवसांत पीक विम्याची भरपाई रक्कम मिळणार असल्याची मंत्रालयात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी हि माहिती दिली आहे. पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे.नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई रक्कम लवकरात लवकर देण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपन्यांची आहे. तसेच विमा मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपन्यांनी विचारात घ्यावे.

दुबार नोंदणीपैकी केवळ एक नोंद ग्राह्य धरावी. नोंदणी केलेला कोणताही शेतकरी या प्रक्रियेपासून आणि विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहणार नाही, असे आदेश दिले आहेत. याबाबत विमा कंपन्यांनीही दक्षता घ्यावी, असे म्हटले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम