शेतकऱ्यांना लाभ द्यायचा झाल्यास आर्थिक स्थैर्य देण्यास प्राधान्य द्या – डॉ. अशोक दलवाई

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १६ नोव्हेंबर २०२२ | शेतकऱ्यांना लाभ द्यायचा झाल्यास शाश्वत पर्यावरणासह शाश्वत आर्थिक स्थैर्य देण्यास प्राधान्य द्यायला हवे,’ कृषिक्षेत्रात प्रभावी विपणनाचा अवलंब करावं असे प्रतिपादन केंद्रीय सचिव व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई यांनी कोल्हापूर येथे थे केले.

कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला तारलेआहे. कोरोना काळात कृषिक्षेत्राने देशाच्या अर्थव्यवस्थेस तारले. यातून शेतकरी हेच समाजाच्या प्रगतीचे केंद्र बिंदू आहेत, हे सिद्ध झाले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

paid add

शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग व हैदराबादच्या दि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल मार्केटिंगतर्फे (आयएसएएम) ‘कृषी विपणन’ विषयावर आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते.
डॉ. दलवाई म्हणाले, ‘‘विपणनाबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमता वृद्धिंगत होण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याची तसेच कृषी-अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार संधी विकसित करण्याची गरज आहे.
नवडिजिटल तंत्रज्ञान डिसरप्टिव्ह (विध्वंसक) आहे. त्यात सेन्सर तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. तथापि, संगणकाप्रमाणे हे तंत्रज्ञान नवरोजगार निर्मितीस चालना देत असेल तर लाभदायी ठरेल. उपलब्ध रोजगार त्यामुळे प्रभावित होत असतील, तर मात्र त्यांचा फेरविचार करावा लागेल.’’

आयएसएएम’चे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव ‘आयएसएएम’चे सचिव डॉ. टी. सत्यनारायणा, नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. सत्यसाई, जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर रानडे आदी या वेळी उपस्थित होते. परिषदेचे समन्वयक डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रास्ताविक केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या कट्टी यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम