कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I यंदा देशात तुरीची लागवड कमी झाली. तसंच पिकाचं नुकसानही झालं. त्यामुळं तुरीचं उत्पादन कमी राहीलं, याचा अंदाज शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळं शेतकरी तुरीची विक्री एकदाच न करता टप्प्याटप्याने करू शकतात, असं सध्या व्यापारी सांगत आहेत.
बाजारात एकदाच आवकेचा दबाव न वाढता मर्यादीत पुरवठा झाल्यास दरही टिकून राहतील. सद्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर आवकेच्या काळात टिकून राहू शकतो. तर चालू हंगामाचा विचार करता तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम