शेतकऱ्यांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I कोकणातील पिकांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञान अवजारे , शेती सल्ला शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होण्यासाठी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना एका क्लिकवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे.

 

तसेच दापोली येथील माहिती तंत्रज्ञान कार्यालयात कोकणातील पिकांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून ॲण्ड्रॉइड फोनवरही उपलब्ध होणार आहे.कोकण कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हे पेपरलेस पद्धतीने जोडले जात आहेत.

 

आधुनिक काळात शेतकऱ्यांच्या हातामध्ये ॲण्ड्रॉइड मोबाईल उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. याचा विचार करून कोकण कृषी विद्यापीठाने त्यांचे संकेतस्थळ अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम