कृषी सेवक I १ डिसेंबर २०२२ I राज्यात साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरू झाला आहे. यंदा साखर कारखाने इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इथेनॉलला वाढती मागणी आहे.
रशिया-युक्रेन युध्दामुळे इथेनॉलच्या दरात वाढ झाली आहे. तसेच केंद्र सरकारनेही इंधनामध्ये इथेनॉल मिसळण्याचे म्हणजे ब्लेंडिंगचे प्रमाण वाढवण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे इथेनॉलला चांगला दर मिळत आहे. गेल्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीतून ९५०० कोटी रूपये मिळाले, तर यंदा इथेनॉलमधून १२ हजार कोटी रूपये मिळतील, असा अंदाज राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम