या योजनेतून करा कांदाचाळ, मिळेल मोठी मदत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ |शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता  राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.अर्थसहाय्यचे स्वरूप – ५, १०, १५, २० व२५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये ३५००/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील.एका लाभार्थ्याला २५ मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे अ . ७/१२ब. ८ अ क.आधार कार्डाची छायांकित प्रत ड.आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रतइ.जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)ई.यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम