राजू शेट्टी यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ | उस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले होते. आता ते चक्काजाम आंदोलन करण्याच्या तयारीत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांना 29 नोव्हेंबर रोजी निमंत्रित करण्यात आले आहे.

त्यामुळे शेट्टी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी, ऑनलाईन वजनकाटे तसेच गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचे दोनशे रुपये मिळावेत, वाहनधारक व मजूर महामंडळांमार्फत पुरवण्यात यावेत या मागण्यांसाठी स्वाभिमानीकडून एल्गार पुकारण्यात आला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी उस परिषद घेतली आहे. सरकारने दोनवेळा फसवणूक केली असून जर 29 नोव्हेंबरच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर 3 डिसेंबरला मोठ्या ताकदीने चक्का जाम करू असेही ते म्हणाले. राज्यातील एकही महामार्ग, राज्यमार्ग सुरु राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आता आरपारची लढाई असेल, असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम