कोल्हापूर बाजार समितीमध्ये गूळ सौडतात गुळास ३३०० ते ५१०० रुपये दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या गूळ सौद्यात गुळास ३३०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजार समितीतील वडणगे विकास सेवा संस्था मर्या. वडणगे या अडत दुकानात सौदे काढण्यात आले.

बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या हस्ते गुळाचे सौदे काढण्यात आले. पाडव्याच्या दिवशी १९ हजार २८० गूळ रव्याची आवक झाली. यंदा उसाची उपलब्धता चांगली होणार असल्याने गुळाची आवकही वाढण्याची शक्यता आहे.

बाजार समितीतील सर्वच घटकांनी यंदाचा हंगाम सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. जगताप यांनी केले. प्रशासक मंडळाचे सदस्य बाजीराव जाधव, समितीचे सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सूर्यवंशी, के. बी. पाटील आदींसह गूळ उत्पादक व बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम