कांद्याच्या दरात होतेय सुधारणा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ देशात दिवाळी सणामुळं कांद्याला मागणी वाढलेली दिसते. मात्र दुसरीकडं आवक कमी होते. त्यामुळं कांदा दर काहीसे सुधारलेले दिसतात. सध्या कांद्याला सरासरी १ हजार ५०० रुपये ते २ हजार १०० रुपये दर मिळतो आहे.

मात्र यंदा वाढलेला निविष्ठांचा खर्च, पावसामुळं नुकसान आणि अतिउष्णतेनर झालेली कांदा सड, यामुळं कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल २ हजार २०० रुपयांपर्यंत पोचलाय. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. मात्र पुढील काळात कांदा पुरवठा मर्यादीत होऊन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम