नगर येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ |नगरच्या रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियाने राबविण्यात येतात. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार आहे. ११ ऑक्टोबरपासून या अभियानास सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.रामस्थांना प्रोत्साहित करत नागरिक, कर्मचारी, तसेच लोक प्रतिनिधी, सक्रिय सहभाग नोंदवून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घ्यावा असे आवाहन केले आहे. या अभियानात सहभागी घेणाऱ्या गाव, प्रभागाला स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार दिले जाणार असून त्यात जिल्हा परिषद गट स्तरावर प्रथम ६० हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम ६ लाख प्रथम, द्वितीय ४ लाख, तृतीय ३ लाख. विभाग स्तरावर प्रथम १२ लाख, द्वितीय ९ लाख, तृतीय – ७ लाख. राज्यस्तर – प्रथम ५० लाख, द्वितीय ३५ लाख, तृतीय ३० लाख. या शिवाय जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या ग्राम पंचायती वगळून जिल्हा , विभाग व राज्य स्तरावर संबंधित ग्राम पंचायतींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम