वांग्याची आवक वाढल्याने दरात घसरण

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | राज्यातील अनेक बाजारांमध्ये आता वांग्याची आवक वाढत आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि नाशिक बाजारांमध्ये वांग्याची आवक चांगली होत आहे. तर इतर बाजारांमध्ये आवक वाढत आहे. त्यामुळं वांग्याचे दर काहीसे नरमले आहेत. मात्र तरीही अनेक बाजारात वांग्याला चांगला दर मिळतोय. सध्या राज्यात वांग्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. आवक वाढल्यानंतर वांग्याचे दर दबावात येऊ शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम