संत्रा बाजारात दाखल ; मिळतोय हा दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | राज्यातील संत्री आता बाजारात दाखल होत आहे. मात्र सध्या संत्रीला कमी दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या संत्र्याला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. . चालू हंगामात पिकाला पोषक वातावरण नव्हते, परिणामी संत्र्यामध्ये गोडी उतरली नाही. तर काही ठिकाणी कीड-रोगामुळे गुणवत्ता कमी झाली. याचा फटका आता संत्रा पिकाला बसत आहे. संत्र्याला मागणी वाढल्यानंतर दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम