तुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | देशात टंचाई असल्याने सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. तसेच चालू हंगामातही तुरीचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दरात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदार यांच्याकडील तुरीच्या साठ्याची माहिती मागितली आहे. सरकारला देशात तुरीचा नेमका किती साठा आहे याचा अंदाज घ्यायचा असल्याने माहिती मागवल्याच सांगितलं जातं. सध्या देशात तुरीला ७ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम