कमी पाण्यात येणारे धानाचे १२ नवीन वाण विकसित!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ एप्रिल २०२४ | महाराष्ट्र राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान या पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असते. परंतु, आता बंगळुरू येथील एका नामांकित कंपनीने कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या १२ प्रजाती विकसित केल्या असून धानाच्या या सर्व पद्धतीने रोपे तयार न करता, थेट पेरणी करून लागवड करता येणार आहे. हवामान बदलामुळे सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होत आहे. ज्यामुळे अधिक पाण्याची गरज लागणाऱ्या प्रजातींऐवजी कमी पाण्यात येणाऱ्या धान प्रजातींची गरज निर्माण झाली आहे. सदर गोष्ट लक्षात घेऊन, सदर वाणांची निर्मिती करण्यात आली आहे.

किसानक्राफ्ट कंपनीचे अध्यक्ष रवींद्र अग्रवाल यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, कंपनीने २०१७ मध्ये धानाच्या थेट पेरणी पद्धतीने केल्या जाणाऱ्या वाणांच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले. त्यानुसार नवीन १२ डीएसआर वाणांच्या निर्मितीसाठी देशभरातील १७५ धान प्रजातींचा अभ्यास कंपनीने केला. त्यानंतर आपली नवीन १२ वाण विकसित केले आहेत. तसेच त्यांची चाचणी देखील करण्यात आली आहे. हे सर्व वाण कमी पाण्यात अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे.

paid add

अग्रवाल यांनी सांगितले की, येत्या खरीप हंगामात देशातील १४ मुख्य राज्यांमध्ये या धानाच्या वाणांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर या सर्व वाणांचे बियाणे वर्ष २०२५ पासून बाजारात उतरवण्याचे लक्ष्य कंपनीने निर्धारित केले आहे. कंपनीचे सर्व डीएसआर वाण बारीक दाणे, मध्यम आणि टपोऱ्या दाण्यांचे मिश्रण आहे. या सर्व वाणांचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त मिळते. कंपनीने तयार केलेल्या धानाच्या या सर्व प्रजाती अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजातींइतक्याच सक्षम आहे. ज्या एकरी २२ ते २५ क्विंटल उत्पादन मिळवून देऊ शकतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम