“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता” – खासदार संजय राऊत

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ मे २०२४ | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मतदान होणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही तयार होतो, पण त्यांची आपापसात चर्चा झाली असे शरद पवारांनी माध्यमांना सांगितले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना धक्कादायक खुलासा केला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा विरोध होता, असा दावा संजय राऊत यांनी केला.

कांदा बियाणे: ‘या’ तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार कांदा बियाणे; राहुरी विद्यापीठाची माहिती

“सरकारचे नेतृत्व अशा व्यक्तीने करावे जे महाविकास आघाडीत नेत्यांना मान्य असेल, असे शरद पवार आणि राहुल गांधी यांचे मत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, हे सांगणारे पहिले सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते. आम्ही वरिष्ठ आहोत, त्यामुळे कनिष्ठ माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, ही त्यांची भूमिका होती. २०१९ साली जेव्हा मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु झाला होता, तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली होती. शिवसेनेकडून शिंदे यांचेच नाव पुढे केले गेले होते.

नोटिफिकेशन अपडेट पोर्टल: मिळवा तुमच्या जमिनीवरील घडामोडींची त्वरित माहिती

पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला की, दिल्लीचा निर्णय मुख्यमंत्रीपदाबाबत काय येईल ते माहिती नाही. पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत, ही फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका होती. शिंदे तेव्हा कोणालाच नव्हते. त्यांचा अनुभव कमी होता. शिंदे यांच्या कामाची पद्धत “पैसा फेको तमाशा देखो” अशी असल्याने त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे, अशी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका नव्हती. ही भाजपची भूमिका आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याआधीची होती,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम