कृषी सेवक | १९ मे २०२४ | नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे की, रविवारी मान्सून अंदमानात पोहोचणार आहे आणि ३१ मे रोजी केरळात दाखल होणार आहे. हवामान विभागाने यंदा १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरवर्षी मान्सून १ जूनला केरळात येतो, परंतु यंदा एक दिवस आधी म्हणजे ३१ मे रोजी येणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २८ मे ते ३ जूनदरम्यान मान्सून भारताच्या मुख्यभूमीत पोहोचू शकतो.
जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी
मान्सून केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर येतो. यंदा अंदमानात १९ मे रोजी मान्सून दाखल होईल. गेल्यावर्षी अंदमानात १९ मे रोजी मान्सून आला होता, परंतु केरळात ८ जूनला पोहोचला होता. यंदा तशी स्थिती बदलू शकते.
ला निना परिस्थितीमुळे यंदा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी अल निनोमुळे कमी पाऊस झाला होता, परंतु यंदा ला निनामुळे अधिक पाऊस होईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अखेर, लिंबूचे दर कमी झाले; गोणीमागे ४०० ते ५०० रुपयांनी घट
महाराष्ट्रात मान्सून ११ जून रोजी पोहोचेल, असा अंदाज आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, २३ मेपासून दक्षिण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल आणि २७ मेपासून राज्यभरात वळीव पाऊस होईल.
दिल्लीसह उत्तरेकडील ११ राज्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज असून, दिल्ली, पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक परिणाम होईल. पश्चिम दिल्लीच्या नजफगडमध्ये ४७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.
नोटिफिकेशन अपडेट पोर्टल: मिळवा तुमच्या जमिनीवरील घडामोडींची त्वरित माहिती
भारतात १८ ते २१ मेदरम्यान ५४.३० कोटी लोकांनी उष्णतेची लाट अनुभवली आहे. रविवारी मान्सून अंदमानात दाखल होईल आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल, असे डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम