गव्हाची काढणी करताना लक्षात ठेवा या गोष्टी, होणार नाही नुकसान!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ एप्रिल २०२४ | सध्या गहू उत्पादक राज्यात गव्हाची काढणी सुरू आहे.एप्रिल महिन्यात शेतकरी गव्हाची काढणी करतात. अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी काढणीची प्रतीक्षा सुरू आहे. उशिरा काढणी केल्यास या वेळी गव्हाचे अधिक उत्पादन मिळू शकते, असे मत राज्यातील शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे. IARI दिल्लीच्या कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकर्‍यांसाठी गहू कापणीच्या संदर्भात महत्त्वाचा सल्ला दिला. जेणेकरून शेतकऱ्यांना गहू काढणीचा अधिक फायदा मिळू शकेल.

गहू कापणीच्या संदर्भात पुसा शास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेला सल्ला मध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, शेतकर्‍यांनी पहाटेची वेळ गहू काढणीसाठी सर्वात योग्य वेळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गव्हाची काढणी पहाटे च्या सुमारास करावी.

गव्हाची कापणी हाताने केली जात असेल तर पिकाचा गुंडाळा ३ ते ४ दिवस शेतातच सोडावा जेणेकरून ते सूर्यप्रकाशात सुकल्यांनंतर त्यातील ओलावा कमी होईल.

शेतकऱ्यांनी एप्रिल अखेरपर्यंत सर्व प्रकारच्या गव्हाची कापणी करावी.
ज्या शेतकऱ्यांना विळी किंवा कापणी यंत्राच्या साहाय्याने गव्हाचे पीक काढायचे आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे की कापणी करताना गव्हाचे पीक पृष्ठभागापासून ४ ते ५ सें.मी. उंचीवर कापावे.

paid add

पीक कापताना दाण्याचा आवाज येत असेल तर समजून घ्या की पीक काढणीसाठी पूर्णपणे तयार झालेले आहे. अश्या पद्धती द्वारे पीक काढणीसाठी तयार आहे की नाही हे शेतकरी सहजपणे ओळखू शकतात.
काढणी दरम्यान धान्यातील ओलावा १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

काढणीच्या वेळी बियाण्यातील ओलावा कुठेही जास्त दिसला तर ते शेतात सोडून सुमारे चार ते पाच दिवस वाळत घालावे. पूर्णपणे वाळल्यानंतरच मळणी करावी.

पिकांची कापणी उशीरा केल्यास त्याचा पिकाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय पक्षी आणि उंदरांमुळेही पिकाचे नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी करावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम