सोयाबीन दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयाने सुधारले

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन दर काहीसे सुधारले होते. तर सोयातेल आणि सोयापेंडचे दर काहीसे स्थिर होते. मात्र देशात काही बाजारांमध्ये सोयाबीन दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. आज काही बाजारांमध्ये सोयाबीन दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयाने सुधारले आहेत.
आज देशातील बाजारात जवळपास २ लाख ६० हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते, अशी माहिती व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्सनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर दबावात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवकही कमी केली. आज काही बाजारांमध्ये सोयाबीन दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांनी सुधारले होते. आज देशात सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ६०० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले.प्रक्रिया प्लांट्सेच दरही आज ५० ते १०० रुपयांनी वाढले होते. आज मध्य प्रदेशातील प्रक्रिया प्लांट्सचे दर प्रतिक्विंटल ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते.

तर महाराष्ट्रातील दर ५ हजार ५०० ते ५ हजार ७५० रुपयांवर पोचले होते.सध्या आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजार दबावात आहे. तसेच सोयाबीनमधील तेजीही टिकताना दिसत नाही. खाद्यतेलाचे दर सुधारण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास सोयाबीनलाही आधार मिळू शकतो.

त्यामुळे सध्या दबावात दिसत असलेले देशातील सोयाबीन दरही सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सोयाबीनची दरपातळी चालू हंगामात किमान सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम