फळे व भाजीपाला जास्त काळ टिकविण्यासाठी याचा अवलंब करा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | फळे व भाजीपाला हे नाशवंत असल्याने यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने बनविणे तसेच त्याचा साठवणुकीचा कालावधी वाढविणे गरजेचे आहे. अशा मूल्यवर्धित फळभाजीपाल्याची योग्य वेळी विक्री करून चांगले आर्थिक उत्पन्न मिळविता येते.

भारतात फक्त ०.५ ते १ टक्के कृषी उत्पादनावर प्रक्रिया होते. एकूण उत्पादित केलेल्या मालापैकी २५ ते ३० टक्के माल दरवर्षी नाशवंत होतो. ठराविक हंगामामध्ये मिळणारी कृषी उत्पादने बाजारपेठेत एकदम आल्यास दर पडून मातीमोल किमतीला विकली जातात किंवा फेकून दिली जातात. अशावेळी मालावर प्रक्रिया करून साठवणुकीचा कालावधी वाढविल्यास त्याची मूल्यवृद्धी करता येते.

फळे व भाजीपाला साठवणुकीचा कालावधी वाढविण्यासाठी सुकविणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. अलीकडे सुकविणे ही पद्धत घरगुती स्तरावर न राहता त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. तांत्रिक पद्धतीने भाजीपाल्यातील पाण्याचा अंश कमी करून त्याचा साठवण कालावधी वाढविता येतो.
ठराविक हंगामामध्ये मिळणारी फळे व भाजीपाला बाजारपेठेत एकदम आल्यास दर पडतात. अशा वेळी त्यांच्यावर प्रक्रिया करून साठवणुकीचा कालावधी वाढविल्यास त्यांची मूल्यवृद्धी होते, शिवाय योग्यवेळी विक्री करून चांगले आर्थिक उत्पन्नही मिळविता येते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम