खरिपाचा लाल कांदा उशिरा येणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | खरिप लाल कांदाही यंदा बाजारात जवळपास दोन महिने उशीरा येण्याचा अंदाज आहे. लाल कांदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येऊ शकतो. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली.

देशात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे महत्वाचे खरिप कांदा उत्पादक राज्ये आहेत. मात्र या कांदा उत्पादक राज्यांमध्ये अतिपाऊस आणि कमी पावसाचा कांदा पिकाला फटका बसला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात जून महिन्यात कांदा लागवडीसाठी पुरेसा पाऊस पडला नाही. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जास्त पाऊस झाला. जुलै महिन्यात कांदा रोपवाटीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कर्नाटकात कमी पावसामुळे शेतकऱ्यांना रोपे टाकता आली नाहीत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम